I am a farmer, I walk this long journey – A Poem

मी एक शेतकरी, करतो पायी हा प्रवास मी एक शेतकरी, माझा हा संघर्ष… उभ्या भारताचा मी पोशिंदा, पण माझं जगणं कठीण… दुष्काळ, कर्ज, पीक दर….किती गणवू माझ्या व्यथा… माझा आवाज पोहचवया करतो पायी हा मी प्रवास… उभं आयुष्य गेलं शेतीतं… माझं रगात न् घाम मिसळलं या मातीत ऐका हो जरा माझं करतो पायी हा मी प्रवास… पाहिलं ना ओ मी ऊन न् वारा… राबलो दिन-रात, पण हाती काही नाही आले… तोच कोरा हात घेऊनी, करतो पायी हा प्रवास… आता रडूही येईना, माझी आसवं सुकली… इतकं का भोगतोय, मी शेतकरी म्हणून? नको हा जन्म पुन्हा, यासाठी पायी हा प्रवास… असं काय मी मागतोय, माझं हक्काचं जगणं जगाल का हो तुम्ही माझं हे जीवन? माझा आवाज पोहचवया, करतो पायी हा प्रवास… माझा अंत होण्याआधी, जरा ऐका हो माझं...

Back to Top